जातीय दंगली आणि त्यामागील विचारप्रणाली
१८९३ साली मुंबईत पहिली जातीय दंगल झाली. म्हणजे एका अर्थी यावर्षी आपण जातीय दंगलींचा शतकोत्सव साजरा करीत आहोत. गेल्या शंभर वर्षांत अशा जातीय दंगलींचा उद्रेक अधून मधून सतत होत आला आहे व त्या दंगलींतून माणसातील पशुत्वाचे दर्शनही भरपूर झाले आहे. प्राणहानी व वित्तहानी किती झाली याचे तपशीलवार आकडे या दंगलींच्या अहवालातून उपलब्ध आहेत. अशा दंगलींमुळे …